विविध मागण्यांसाठी तैलिक महासभेचे तहसीलदारांना निवेदन

विविध मागण्यांसाठी तैलिक महासभेचे तहसीलदारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका प्रांतिक तैलिक महासभा संघटना व तेली समाज यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता.3) सकाळी 11 वाजता मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले.

सदर निवेदनात म्हंटले आहे की, हिमाचल प्रदेशमध्ये तेली समाजाला मागास जातीमध्ये समाविष्ट केले असून त्याचे क्षेत्र हिमाचल प्रदेश पुरतेच मर्यादित न ठेवता तोच नियम संपूर्ण देशात लागू करावा, देशातील सर्व ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसींना त्यांच्या संख्येनुसार कमीत कमी 52 टक्के आरक्षण द्यावे, राज्या-राज्यातील ओबीसींची जाती किंवा पोटजातीमधील दुजाभाव बंद करावा व सर्व पोटजातींना मुख्य जातीमध्ये व ओबीसींमध्ये समाविष्ट करून घ्यावे, जनगणनेचा अर्ज जाती किंवा पोटजातींच्या कलमासह सुधारित करावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी महासभेचे उत्तर नगर जिल्ह्याचे युवाध्यक्ष विलास वालझाडे, महिला सचिव अश्विनी वालझाडे, उपाध्यक्ष प्रदीप कर्पे, युवा सचिव रुपेश वालझाडे, तालुकाध्यक्ष श्याम कर्पे, महिला तालुकाध्यक्षा शोभा बनसोडे, शहराध्यक्ष विशाल वालझाडे, महिला शहराध्यक्षा मोहिनी वालझाडे, शिवाजी वालझाडे, अशोक वालझाडे, नंदकिशोर कर्पे, दत्तात्रय पाबळकर, अनिता खाडे, कीर्ती भागवत, योगेश क्षीरसागर, अजित वालझाडे, सचिन वालझाडे आदी उपस्थित होते.

 

Visits: 217 Today: 3 Total: 2062962

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *