यूनिव्हर्सलमध्ये सीएनसीच्या कोर्सला प्रारंभ
यूनिव्हर्सलमध्ये सीएनसीच्या कोर्सला प्रारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील इंदिरानगर गल्ली क्रमांक चारमधील यूनिव्हर्सल औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात चालू शैक्षणिक वर्षापासून 6 महिने कालावधीचा सीएनसी प्रोग्रामर कम ऑपरेटर हा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ मान्यता प्राप्त प्रमाणपत्र कोर्स अॅक्टीव्ह टेक्नो नाशिक यांचे सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन संस्थेने सुरू केला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य एन.के.नागरे यांनी दिली.
सदर कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कॅड कॅमसह सीएनसी प्रोग्रामिंग व मशीन ऑपरेटिंग प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार असून प्रत्यक्ष सीएनसी मशीनवर जॉब करून घेतले जातील. या कोर्सला 100 टक्के जॉब प्लेसमेंट असून प्रत्येक कंपनीमध्ये सीएनसी मशीनचा वापर होत असल्याने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षणासाठी संस्थेकडे सुसज्ज कॉम्प्युटर लॅब व जपान तंत्रज्ञानावर आधारित मियानो कंपनीचे फानुक कंट्रोलचे सीएनसी मशीन उपलब्ध आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रमाणपत्र दिले जाईल. सदर कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आयटीआय किंवा डिप्लोमा/डिग्री उत्तीर्ण असावा, अथवा बारावी टेक्निकल (एमसीव्हीसी) विषयासह उत्तीर्ण असावा. सदर कोर्सचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.