राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साकुर मध्ये पार पडले पथसंचलन

नायक वृत्तसेवा, साकुर 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त  संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात शुक्रवारी पथ संचलन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी स्थापना केली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवातीची प्रेरणा म्हणजे चारित्र्य प्रशिक्षण देणे आणि हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील राहत हिंदू समाजाच्या  हक्कासाठी सदैव पाठीशी उभे राहावे हे मुख्य उद्दिष्ट आहे. साकुर येथील बिरोबा मंदिर ते साकुर बस स्टॅन्ड, ग्रामपंचायत कार्यालय, तिरवाडी चौक,कुंभार गल्ली, जुनी बाजारपेठ आदी भागातून ढोल ताशाच्या गजरात पथसंचलन करण्यात आले.मारुती मंदिरासमोर मान्यवरांचे स्वागत करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या दिनानिमित्त उपस्थित  कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वाचे मुद्दे सांगत हिंदू समाजाचे महत्व  या बद्दल माहिती दिली.
यावेळी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ गांधले, गाडेकर, बोऱ्हाडे व साकुर पठार भागातील सखल हिंदू समाज, बजरंग दलाचे संतोष खेमनर, बाजीराव खेमनर, तुषार पेंडभाजे, सुभाष पेंडभाजे,  पै.बाजीराव खेमनर, मिथुन केदारी,सुभाष भुजबळ,तुषार भगत, अमित खिल्लारी,युवक तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 301 Today: 1 Total: 2128700

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *