संगमनेरात संस्कृत भारतीची नूतन कार्यकारिणी जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर  
संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्कृत भारती या राष्ट्रीय संस्थेची संगमनेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंगळवारी झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृतभारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा, डॉ.रुपाली कापरे  होत्या. संस्कृत भारती ही देशपातळीवरील  संस्था १९८१ साली दिल्ली येथे स्थापन झाली असून, आज ती भारतासह परदेशातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. ‘मनसा सततं स्मरणीयम्, वचसा सततं वदनीयम् लोकहितं मम करणीयम्’ या भावनेतून संस्कृत भारतीचे ध्येय प्रत्येक भारतीयांच्या बोलण्यात व संस्कारांत संस्कृत रुजविण्याचे संस्थेचे कार्य मोठे आहे. ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनात ठेवून सर्व स्वयंसेवक संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारचे कार्य करत असतात.
संगमनेर तालुका कार्यकारिणीत नवनियुक्त तालुका संयोजक म्हणून ए. टी. जोशी यांची निवड करण्यात आली.  तर सहसंयोजिका म्हणून मनिषा मोहोळे व योगिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
बालकेंद्र विभाग संयोजक – सुलभा जोशी, शकुंतला खोजे व भारती दळवी,सुभाषित व संभाषण प्रशिक्षण – विद्या कुलकर्णी, मोहिनी कानवडे, मल्हार सराफ, गीता प्रशिक्षण विभाग- दाक्षायणी भाटे, पूजा दिक्षित यांच्या निवडी यावेळी घोषित करण्यात आल्या. बैठकी दरम्यान नव्या कार्यकारिणीने संगमनेर तालुक्यात संस्कृत संभाषण वर्ग, गीता प्रशिक्षण, सुभाषित पाठांतर, संस्कृत नाट्यवर्ग व बालकेंद्र उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यकारिणीची उद्घोषणा, सूत्रसंचालन व आभार अहिल्यानगर जिल्हा संयोजक सौरभ म्हाळस यांनी व्यक्त केले.
Visits: 214 Today: 1 Total: 1986468

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *