वसुंधरा अकॅडेमीत महात्मा गांधी जयंती उत्साहात

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील वसुंधरा अकॅडेमीत महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अभिनव शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष तसेच प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख तसेच उपप्राचार्या राधिका नवले, सुनील खताळ, वृषाली शेटे, प्राजक्ता नेटके यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

गांधी जयंती निमित्त शाळेमध्ये स्वच्छता अभियान सप्ताह तसेच पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या. गांधीजींच्या जीवनावर आधारित एक नाट्यप्रयोग इयत्ता ७ वी चे विद्यार्थी कार्तिकी सांगळे, दिवीत रेवगडे, ओम तळोले, आर्यन हासे, वरद दाताखिळे, निषाद साबळे, तन्मय बोडके या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केला. अनुष्का उघडे, तन्वी काकड, आराध्य आभाळे, श्लोक दहीतुल्ये व समीक्षा बांबळे या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे केली. तसेच नवमीचे औचित्य साधून श्वेता कानकाटे, समीक्षा नवले, साक्षी, रोहिणी नवले, मृण्मयी शेणकर, प्रणिती घुले व स्नेहल शेटे या विद्यार्थ्यांनी गरबा नृत्य सादर केले.गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक दुर्गा जाधव,द्वितीय क्रमांक प्राप्ती शेटे व तृतीय क्रमांक अनुराग तेलोरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी दक्षा खुळे व श्रद्धा लांडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येलो द डायमंड हाऊसचे हाऊस मास्टर रक्षा पांडे, पुष्पा हासे व अण्णासाहेब केदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक सुनील खताळ यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या विचारांचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना या मूल्यांचा अंगीकार करून समाजासाठी आदर्श घडविण्याचे मार्गदर्शन केले.

Visits: 23 Today: 1 Total: 1114509
