वॉटरपोलो स्पर्धेत पुणे विजेता, विखे पाटील स्कूल उपविजेता

नायक वृत्तसेवा, राहाता
अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल आणि अहिल्यानगर जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक स्कूल जलतरण तलावावर पुणे विभागीय शालेय वॉटरपोलो स्पर्धा उत्साहात पार पडल्या.अंतिम सामन्यात पुणे येथील एस. पी. कॉलेजचा संघ विजेता ठरला, तर पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिक स्कूल, लोणी संघाने उपविजेतेपद पटकावले.

या स्पर्धेचे उद्घाटन सैनिक स्कूलचे कमांडंट कर्नल सुभाष घोडागेरी, प्राचार्य राजेश माघाडे, कॅप्टन एकनाथ धनगर, सचिव रावसाहेब बाबर, प्रशिक्षक अखिल शेख, बापूसाहेब गायकवाड आणि योगीता तनपुरे यांच्या उपस्थितीत झाले.
ध्रुव ग्लोबल स्कूल, पुणे संघाने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानले. स्पर्धेचे पंच म्हणून प्रणित ढोकळे आणि क्षितिज बाबर यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेत्या संघाचे संस्थेचे चेअरमन आणि राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनी विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, सचिव भारत घोगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, लीलावती सरोदे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे आणि संतोष वाबळे यांनी अभिनंदन केले.

Visits: 39 Today: 2 Total: 1100754
