उच्च तंत्रशिक्षणात ‘ढाकणें’ चे कार्य भरीव : आ.तांबे 

नायक वृत्तसेवा, शेवगाव
डॉ. एकनाथ ढाकणे व त्यांच्या कुटुंबियांनी राक्षीच्या उजाड माळरानावर शैक्षणिक नंदनवन उभे केले आहे. ग्रामीण भागातील मुलामुलींना माफक दरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. उच्च तंत्रशिक्षणाबरोबरच परिसरातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे ही संस्थेची मोठी जमेची बाजू आहे. उच्चतंत्र शिक्षणात ढाकणे शैक्षणिक संकुलाचे कार्य भरीव असल्याचे गौरवोद्गार आ. सत्यजित तांबे यांनी काढले.
केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संगमनेर संचलित तालुक्यातील राक्षी येथील ढाकणे शैक्षणिक संकुल अंतर्गत समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक येथे कै. सुनिता ढाकणे यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित्त ‘प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच औचित्याने मध्यवर्ती प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आ. सत्यजित तांबे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. सत्यजित तांबे बोलत होते.यावेळी संस्थेने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आ. तांबे यांनी २५ संगणकांची संगणक प्रयोगशाळा देण्याची घोषणा केली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, ट्रस्टचे विश्वस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक हर्षा ऋषिकेश ढाकणे यांनी केले. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी केदारेश्वर ट्रस्ट व शिक्षकवृंदाने एक लाख रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांचे वाटप झाले. यावेळी ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भीमाशंकर नागरे यांचाही सत्कार  करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत ढाकणे, कोषाध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, सचिव जया ढाकणे, प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्लेसमेंट ऑफिसर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निलेश पर्वत  यांनी केले तर संयोजन प्रा. महेश मरकड, प्रवीण नागरगोजे,विश्वास घुटे, संपदा उरणकर, ज्ञानेश्वर गरपगारे, कृष्णा ढाकणे, श्रीमती पंचांरिया, बतुळे, लहू गाढे, श्रीमती येवले  यांनी केले.आभार सुनील औताडे यांनी केले.
डॉ.एकनाथ ढाकणे यांनी आपल्या भाषणात आ. तांबे यांच्या युवक, शेतकरी व पदवीधरांच्या प्रश्नांसाठी असलेल्या सातत्यपूर्ण लढ्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेखही सादर केला. 
Visits: 103 Today: 1 Total: 2124903

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *