विद्यार्थ्यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची ‘रॉयल स्टोन’ निवासस्थानी भेट

नायक वृत्तसेवा, झरेकाठी
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईतील ‘रॉयल स्टोन’या शासकीय निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पारनेर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागातील विद्यार्थी अभ्यास क्षेत्रभेटीच्या निमित्ताने मुंबई येथे गेले होते. यावेळी त्यांनी एशियाटिक लायब्ररी, मध्यवर्ती ग्रंथालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयास भेट दिली.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईतील ‘रॉयल स्टोन’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत त्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच समाजभान, वाचनसंस्कृती आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच विद्यार्थांना भावी वाटचालीसाठी दिशा दाखवणाऱ्या ठरतात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिनेश बाबर, प्राचार्य डॉ. कुंदा कवडे, कार्यालयीन अधीक्षक गोरख घोलप, प्रा. जाधव, प्रा. शेळके, प्रा. उघडे, प्रा. फापळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Visits: 14 Today: 2 Total: 1098257
