विरभद्र माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील साकुर येथील विरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित पालक मेळावा उत्साहात पार पडला.

यावेळी बोलतांना प्राचार्य सोपान खेमनर म्हणाले,पालक मेळावा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेला एक महत्वाचा संवाद आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पालकांना माहिती असणे आवश्यक आहे. पालकांना सूचना करतांना खेमनर म्हणाले, आपल्या पाल्याला वेळेचे महत्व पटवून देताना अभ्यास तपासून घेत चला.यावेळी अनेक पालकांनी आपापली मते, समस्या मांडल्या. त्यावर शिक्षकांनी समाधान कारक उत्तर देत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी कांतीलाल शेंडगे,केदार, एम. ए. खेमनर, डी. एम. पवार आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 62 Today: 2 Total: 1105248
