आनंदी वर्ग या विषयावर वसुंधरात शिक्षकांची कार्यशाळा

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील अभिनव शिक्षण संस्था संचालित वसुंधरा अकॅडेमीत सीबीएससी शाळेत हॅपी क्लासरूम आनंदी वर्ग या विषयावर कार्यशाळा पार पडली.

संस्थेच्या कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सीबीएससी बोर्डाने नियुक्त केलेले रिसोर्स पर्सन प्रा. समीर अत्तर व सचिन गागरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी स्वतःला आनंदी कसे ठेवावे, स्वतःबरोबर विद्यार्थ्यांना आनंदी कसे ठेवावे, वर्गातील वातावरण आनंदी, आरोग्यदायी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे ठेवण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजी वापराव्यात यावर प्रामुख्याने भर देण्यात आला.

अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले यांनी या प्रशिक्षणाला भेट देऊन सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख व प्राचार्या राधिका नवले व सर्व शिक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. शिक्षकांना आपल्या दैनंदिन कामकाजात आपला वर्ग सदैव आनंदी व हसतमुख ठेवण्यासाठी या प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल. प्राजक्ता नेटके यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील खताळ यांनी आभार मानले.

Visits: 67 Today: 3 Total: 1098422
