‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या महिला विंग कडून वर्दीतील नवदुर्गांचा सन्मान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घरदार सांभाळून, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या संगमनेर शहर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस या वर्दीतील नवदुर्गाचा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून व्हॉईस ऑफ मीडियाच्या महिला विंगच्या वतीने सन्मान करण्यात आला.

शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांना टिफिन बॉक्स व गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख,उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याचे मुख्य संयोजक तथा संचालक कार्यवाहक गोरक्षनाथ मदने, राज्य कोअर कमिटीचे सदस्य अमोल मतकर, पत्रकार भारत रेघाटे, सुभाष भालेराव, महिला विंगच्या जिल्हाध्यक्षा वैशाली कुलकर्णी, जिल्हा सचिव नीलिमा घाडगे उपस्थित होत्या. तसेच महिला पोलीस नाईक लता जाधव, सुजाता थोरात,चारुशीला गोणके,तारा चांडे,अरुणा गभाले,सुवर्णा नवले,जया गभाले,मनिषा पुरी,किरण कातोरे,सोमेश्वरी शिंदे,अनिता सरगच्चे,संगीता डुंबरे,अनिता गीते,आरती पानसरे, छाया बढे,निशा घोडे आदी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या नारी शक्तीचा यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला.महिला पोलिसांनी धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन वैशाली कुलकर्णी यांनी यावेळी केले. व्हॉईस ऑफ मीडियाने राबवलेल्या या उपक्रमाचे संगमनेर पोलिसांनी कौतुक केले.

आज पत्रकारांकडून हा सत्कार स्वीकारताना आनंद झाला. आम्ही आमच्या कर्तव्यावर दक्ष असताना आम्हाला कौटुंबिक सर्व आघाड्या देखील सांभाळाव्या लागतात.प्रसंगी आम्हाला कधी कठोर तर कधी कोमल बनावे लागते,समाजातील अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो.
नारी ही अबला नसून,तिच्यात अपार सहनशक्ती आहे. आणि अन्यायाविरोधात हीच कालिका ही बनते असे महिला पोलीस कर्मचारी लता जाधव यावेळी म्हणाल्या.

Visits: 55 Today: 2 Total: 1108783
