मेडिकव्हरचे वॉकथॉन व सीपीआर प्रशिक्षण उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
 ‘हृदय निरोगी-आयुष्य आनंदी’ या संदेशासह वर्ल्ड हार्ट डे  निमित्त येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने सोमवारी  वॉकथॉन व सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
हा वॉकथॉन मेडिकव्हर हॉस्पिटल येथून सुरू होऊन पेटीट सर्कल मार्गे  बसस्थानक येथे पोहोचला. बसस्थानक परिसरात नागरिकांसाठी मोफत सीपीआर (हृदयविकाराच्या प्रसंगी दिले जाणारे जीव वाचवणारे प्रशिक्षण) घेण्यात आले. शेवटी हा उपक्रम पुन्हा हॉस्पिटल येथे येऊन पार पडला. अध्यक्षस्थानी  बसस्थानक आगार प्रमुख प्रशांत गुंड उपस्थित होते. तसेच मेडिकव्हर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. एकनाथ सानप, डॉ. राहुल गुट्टे आणि डॉ. अमय इथापे यांनी हृदयविकार प्रतिबंध, सक्रिय जीवनशैली व नियमित तपासणीचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.वॉकथॉन दरम्यान ‘चालूया निरोगी हृदयासाठी, पाऊल टाकूया आरोग्यासाठी’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले.  वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकव्हर हॉस्पिटलने जनजागृती उपक्रम व सीपीआर प्रशिक्षण राबवले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हृदयविकार प्रतिबंध, सीपीआरचे महत्त्व व आपत्कालीन परिस्थितीतील जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली.
यावेळी केंद्रप्रमुख डॉ. संदीप ठाकूर यांनी जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा देत खास हार्ट चेकअप पॅकेजचे अनावरण केले. या पॅकेजमध्ये इसीजी, २डी इको, टीएमटी, लिपिड प्रोफाइल, क्रिएटिनिन, आरबीएस तपासणी आणि कार्डिओलॉजी कन्सल्टेशन या तपासण्यांचा समावेश असून, ज्याची मूळ किंमत सुमारे रु. ६,५०० आहे ते पॅकेज फक्त रु. ९९९ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यक्रमाला डॉ. के. एस. झांबरे, ज्ञानेश्वर वाकचौरे, नामदेव वाळुंज, विठ्ठल गायकवाड, अरुण कोते  तसेच  शहरातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
Visits: 163 Today: 1 Total: 1952989

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *