रयतच्या लोणी विद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात 

नायक वृत्तसेवा, झरेकाठी 
रयत शिक्षण संस्थेच्या लोणी विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३८ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
जयंतीदिनी  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची  पारंपारिक लेझिम, झांज पथकासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य  बाळासाहेब के.विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मिरवणुकीत सहभागी होत विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन व कर्मवीरांना वंदन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  अरुण कडू  होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव  विकास देशमुख उपस्थित होते.प्राचार्य  एल.सी. रक्टे यांनी  प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी एकनाथ घोगरे , माजी प्राचार्य बी.जी.आंधळे, सरपंच जनार्दन घोगरे, उत्तम आहेर, नवनाथ बोडखे यांच्यासह आजी माजी रयत सेवक उपस्थित होते. या प्रसंगी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व सत्कार सोहळा पार पडला. सूत्रसंचालन श्रीमती पी.डी. ढोकणे, श्रीमती एस.डी. दाभाडे यांनी केले तर  आभार गुरुकुल प्रमुख  एस.एस.किरवे  यांनी मानले.
Visits: 338 Today: 1 Total: 2123935

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *