अभिनव सायन्सचे रायफल शूटिंग मध्ये नेत्रदीपक यश 

नायक वृत्तसेवा, अकोले 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहिल्यानगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व नेवासा येथील त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  जिल्हा अंतर महाविद्यालयीन रायफल पिस्तूल शूटिंग स्पर्धेत येथील अभिनव सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
शनिवार दि.२७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अभिनव कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाची श्रद्धा अशोक वाळुंज या विद्यार्थिनीने सिल्वर मेडल मिळवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली.तिच्या या यशाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, सचिव  विक्रम नवले, संस्थेच्या कोषाध्यक्ष तथा कॅम्पस डायरेक्टर प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख, संस्थेच्या सहसचिव प्राचार्या अल्फोंसा डी ,सायन्स महाविद्यालयाच्या प्राचार्या. कुसुम वाकचौरे यांनी कौतुक केले. श्रद्धा वाळुंज हिला रायफल शूटिंग प्रशिक्षक सचिन बोंबले, प्रा. सुरेश मेंगाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.
Visits: 279 Today: 1 Total: 2166069

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *