साकुर ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीत

 नायक वृत्तसेवा, साकुर 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभानिमित्त  बुधवारी संगमनेर तालुक्यातील साकुर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच सचिन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम सचिवालयात करण्यात आले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच शंकर खेमनर, जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शालेय पोषण आहार अधिक्षक रूपेश भालेराव, संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य मारूती केदार, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, साकुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रल्हाद बांबळे, साकुरचे तलाठी सोमनाथ शेरमाळे, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, पशुवैद्यकीय अधिकारी वाळुंज उपस्थित होते.
यावेळी ग्रामसभेत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील जनतेला होणार्‍या संबोधनाचे थेट प्रक्षेपण स्क्रीनद्वारे दाखविण्यात आले.दरम्यान ग्रामसभेत आठवडे बाजार, जन्म मृत्यू नोंद, शैक्षणिक, घरकुल, कचरा व्यवस्थापन, बससेवा आदी विषयांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 331 Today: 1 Total: 1917841

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *