नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आदेश : ना.विखे

नायक वृत्तसेवा, पाथर्डी
यापुर्वी कधीही झाला नाही असा पाऊस मागील दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नूकसान झाले आहे.झालेल्या नूकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल.स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.परंतू मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्यात एकूण ४९ हजार हेक्टर क्षेत्रावरील ६९ हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नूकसान झाले असून,३४ गायी, २५० कोंबड्या, शेळी ५०, करडू २५ आणि २६ घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा ३९ वर्षाचा इसम देवळाली नदीत व गणपत हरीभाऊ बर्डे हे ६५ वर्षाचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. त्यांनी तालुक्यातील करंजी, तिसगाव, कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नूकसानीची पाहाणी करून नागरीकांना दिलासा दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे, सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Visits: 62 Today: 1 Total: 1112974
