श्रीमती बालोडे यांनी विद्यार्थ्यांत संस्काराचे बीज पेरले : गुंजाळ

नायक वृत्तसेवा, धांदळफळ
शिक्षण हीच साधना,विद्यार्थी हेच आपले कुटुंब, समजून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मीना बालोडे-आरगडे यांनी विद्यार्थ्यांत संस्काराचे बीज पेरले असल्याचे गौरवोद्गार राजहंस दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील आरगडे बालवाडी वस्तीवरील वस्ती शाळेतील शिक्षिका मीना बालोडे-आरगडे यांची नुकतीच कोपरगाव येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभात गुंजाळ बोलत होते. यावेळी सरपंच विकास गुंजाळ, बाळू खरे, मधुकर गुंजाळ, माजी सरपंच भाऊसाहेब गुंजाळ, वैशाली अर्जुन आरगडे, मुख्याध्यापक नवले उपस्थित होते.

रमेश गुंजाळ पुढे म्हणाले,जीवनात काही क्षण असे येतात जे मनाला स्पर्शून जातात. डोळ्यांत आठवणींचा झरा उभा करतात. आजचा दिवस त्यापैकी एक. कारण, आपल्या शाळेच्या स्थापनादिवसापासून अखंड सेवा देणाऱ्या, मातेसमान वात्सल्याने विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या, शिस्तीचा ध्यास घेऊन संस्कारांचे बीज पेरणाऱ्या शिक्षिका मीना बालोडे (अरगडे ) यांनी शिक्षण हीच आपली साधना, विद्यार्थी हेच आपले कुटुंब,आणि ज्ञानदान हीच आपली पूजा समजून काम केले.

Visits: 72 Today: 2 Total: 1099430
