‘वंदन संविधानाला’ पथनाट्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

नायक वृत्तसेवा, अकोले
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ‘सृजनरंग’ स्पर्धेत येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाने पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

‘सृजनरंग’ सास्कृतिक व साहित्यिक स्पर्धा अहिल्यानगर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे पार पडली. यात विविध महाविद्यालयातून पथनाट्य स्पर्धेत २२ संघांनी भाग घेतला होता. यात अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी ‘वंदन संविधानाला ‘ या विषयावर पथनाट्य सादर केले. या स्पर्धेचा निकाल १६ सप्टेंबर रोजी विद्यापीठाने जाहीर केला. त्यात येथील अगस्ती महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विद्यापीठ पातळीवरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

या पथनाट्याचे संहिता, लेखन व दिग्दर्शन डॉ. रंजना मधुकर कदम यांनी केले. तर कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक देशमुख, प्रा. भानुदास खताळ, प्रा.डॉ.विजय काळे, प्रा.गणेश भांगरे, प्रा. संतोष गावंडे, प्रा. सुप्रिया वैद्य यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत करिष्मा मधे, अजय पथवे, अर्जुन कातोरे, राहुल पोकळे, मनिषा गावंडे, पुजा जाधव, साहील पिंपळे, गौरी पवार, विक्रम कातोरे या स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. सुनिल मोहटे यांनी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त वैभव पिचड, विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनिल दातीर, सचिव सुधाकर देशमुख, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, उपप्राचार्य डॉ. अशोक दातीर, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 61 Today: 1 Total: 1112370
