कुक्कडवेढेत विवाहित तरुणीचा मृतदेह आढळला घातपाताचा माहेरच्यांचा संशय; तिघे पोलिसांच्या ताब्यात

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील कुक्कडवेढे येथे बुधवारी (ता.15) शेतातील विहिरीत एका विवाहित तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळला. मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावरून सासरच्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छाया शिवाजी भुसारे (वय 28, रा. कुक्कडवेढे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. बर्‍याच महिन्यांपासून माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरी शारीरिक व मानसिक छळ होत होता. सासरच्या त्रासाबाबत तिने माहेरच्या लोकांना सांगितले होते. शिवाजी आसाराम भुसारे (पती), आसाराम मारुती भुसारे (सासरे), यमुनाबाई आसाराम भुसारे (सासू), गीताबाई रमेश पंडित (नणंद) यांनी घातपात केल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी शिवाजी आसाराम भुसारे (पती), आसाराम मारुती भुसारे (सासरे), यमुनाबाई आसाराम भुसारे (सासू) या तिघांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.

Visits: 158 Today: 1 Total: 2166236

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *