व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब गडाख

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी झटणाऱ्या, त्यांचे हित जोपासणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब गडाख यांची निवड करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या सुचनेनुसार मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत सर्वानुमते पत्रकारिता क्षेत्रातील बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले बाळासाहेब गडाख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीदरम्यान मावळते जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी नवीन जिल्हाध्यक्षासाठी इच्छुकांची चाचपणी केली. या प्रक्रियेत बाळासाहेब गडाख यांचे नाव सर्वानुमते पुढे आले. त्यांच्या नावाची घोषणा होताच जिल्ह्यातील व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दर्शवले. जणू प्रत्येक पत्रकाराच्या मनातील आवाज एकवटून गडाख यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र या बैठकीत दिसून आले.
या प्रसंगी संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव  दिव्या भोसले, सचिव अमोल मतकर, मावळते जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने तसेच राज्य आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील दोन वर्षांत संघटनेने पत्रकारांच्या हक्कांसाठी बळकट पावले उचलली असून, शालेय साहित्य वाटप, पत्रकारांच्या आरोग्य तपासण्या, दिवाळी फराळ, शासकीय योजनांची जनजागृती यांसह अनेक उपक्रम राबवून संघटन कार्य अधिक बळकट केले आहे.
नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गडाख हे सी न्यूज या वृत्तवाहिनीचे संचालक आहेत. त्यांनी स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर मजबूत जनसंपर्क साधला असून, केडर कॅम्प व अधिवेशनांमधून नवे नेतृत्व घडविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही या निवडीस मान्यता दिली.
गडाख यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही केवळ औपचारिक निवड नसून, पत्रकार संघटनेच्या लढ्याला नवचैतन्य देणारा ऐतिहासिक टप्पा असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास जिल्ह्यातील पत्रकार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मी एकटा पदाधिकारी नसून आपण सर्वजण पदाधिकारी आहोत, या भावनेतून संघटनेचे कार्य करणार आहे. आपण सर्वांनी मिळून जिल्ह्याची संघटना सक्षम व भक्कम करण्यासाठी सचोटीने प्रयत्न करू. माझ्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष  संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले  तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार. संघटनेच्या पंचसूत्री ध्येयधोरणांवर आपण सर्वजण एकत्रितपणे काम करून पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू ठेवू असा विश्वास बाळासाहेब गडाख यांनी निवडीनंतर बोलतांना व्यक्त केला.
Visits: 31 Today: 2 Total: 1098267

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *