अध्यात्मिक सेनेच्या राज्य संघटकपदी किशोर महाराज धुमाळ

नायक वृत्तसेवा, अकोले
शिवसेना (शिंदे गट) धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या राज्य संघटकपदी किशोर महाराज धुमाळ यांची निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी पत्र देऊन धुमाळ यांची निवड जाहीर केली आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा राज्यविस्तार झाला असून, महाराष्ट्रभरातील २०० पेक्षा अधिक साधुसंत व कीर्तनकार जोडले गेले आहेत. त्यामुळे साधुसंतांची राजकीय पक्षाशी थेट समन्वय असणारी शिवसेना संघटना ठरली आहे.

संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या वंशजांचाही या संघटनेत थेट सहभाग असून, हे पाऊल अध्यात्मिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक पर्व ठरले आहे.महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून निवड झालेले किशोर महाराज धुमाळ यांचा दांडगा जनसंपर्क व अध्यात्मिक क्षेत्रात योगदान आहे. ते अकोले येथील रहिवाशी आहेत. अगस्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी व संत रेडा महाराज वारकरी संस्था आळेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Visits: 70 Today: 4 Total: 1108871
