वसुंधरा अकॅडेमीत राष्ट्रीय हिंदी सप्ताह उत्साहात

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील अभिनव शिक्षण संस्था संचलित वसुंधरा अकॅडेमीत राष्ट्रीय हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कारण १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेत देवनागरी लिपीतील हिंदीला देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. म्हणूनच या दिवशी हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे, तिच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तिच्या विकासाला चालना देणे हा मुख्य उद्देश ठेवून शाळेमध्ये हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘हिंदी-आपली राष्ट्रभाषा’या विषयावर अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भाषणे केली. विद्यार्थ्यांचे नृत्य आणि कविताने हा कार्यक्रम बहारदार झाला.

यावेळी वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, इंद्रभान कोल्हाळ, सुनील खताळ, वृषाली शेटे, प्राजक्ता नेटके, सोनिया कोल्हे, सुरेखा शेटे, कल्पना मंडलिक व उज्ज्वला मुसळे यांच्यासह शिक्षिका सोनिया नवले, सुरेखा शेटे, खंडू वैद्य, ब्ल्यू हाऊसचे हाऊस मास्टर कल्पना मंडलिक व उज्ज्वला मुसळे आदी उपस्थित होते. कस्तुरी राऊत व सान्वी झोळेकर या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले तर शिक्षिका सोनिया नवले यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 102 Today: 1 Total: 1105973
