‘त्या’ काळात महिलांना सन्मानाने विश्रांती द्यायला हवी : माजी आ.पिचड

नायक वृत्तसेवा, अकोले
मासिक पाळी या विषयावर सहजतेने मोकळेपणाने बोलले पाहिजे. त्या काळात स्त्रियांना जो त्रास होतो, त्यावर योग्य उपचार झाला पाहिजे. घरातील सर्वांनी तिच्याशी चांगले वागून तिला सन्मानाने विश्रांती दिली पाहिजे. ही जबाबदारी घरातील स्त्री-पुरुष सर्वांची असल्याचे प्रतिपादन माजी आ. वैभव पिचड यांनी केले.

येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींना नरेश राऊत फाऊंडेशनने वर्षभरासाठी सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वाटप केले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून माजी आ. वैभव पिचड बोलत होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. अशोक दातीर यांनी करून दिला. या कार्यक्रमात नरेश राऊत फाऊंडेशनचे संचालक माजी मुख्याध्यापक विलास महाले यांनी फाऊंडेशनचा आजपर्यंतच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, कार्यकारणी सदस्य सुधाकर आरोटे, शरद देशमुख, नरेश राऊत फाउंडेशनचे लेखापाल व प्रशासकीय अधिकारी अंकुश बत्तासे, प्रोग्राम ऑफिसर नवनाथ रजपूत, उपप्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड, उपप्राचार्य चांगदेव डोंगरे, प्रबंधक सीताराम बगाड, डॉ. रंजना कदम, प्रा. अंजना नवले, सर्व महिला प्राध्यापिका व महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.कोमल राठी व डॉ. महेजबीन सय्यद यांनी केले. आभार उपप्राचार्य चांगदेव डोंगरे यांनी मानले.

आतापर्यंत आमच्या फाऊंडेशनने अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना भरघोस मदत केली आहे. अनेक शाळांमध्ये टॉयलेटचे बांधकाम, डिजिटल बोर्ड द, संगणक, खेळाचे व शैक्षणिक साहित्य इ.अनेक मार्गांनी गरजूंना मदत केली असल्याचे नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्रा. लक्ष्मण गोरडे यावेळी म्हणाले.

Visits: 93 Today: 1 Total: 1098664
