राहुरीत घरमालकावर गुन्हा दाखल
राहुरीत घरमालकावर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहुरी
आदिवासी कुटुंबातील भाडेकरु पती-पत्नीला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरुन राहुरीतील कोरडे पिता-पुत्रावर विनयभंग आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी शहरातील मल्हार मार्ग परिसरातील विजय रंगनाथ कोरडे यांच्या मालकीच्या कोरडे इमारतीत ही घटना घडल्याचे फिर्यादी महिलेेने म्हंटले आहे. या इमारतीत संबंधित आदिवासी कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून भाडेतत्वावर राहत आहे. 18 ऑगस्टला घरात वापरायचे पाणी नसल्यामुळे या कुटुंबाने घरमालकाकडे जाऊन पिण्याचे पाणी चालू करा, अशी विनंती केली. त्यावर घरमालक विजय कोरडे, मुलगा प्रसाद यांनी पाणी देणार नाही, असे सांगून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणाची पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी जात पाहणी करुन माहिती घेतली आहे.

