संग्राम भंडारे यांच्यावर कारवाई करा! अकोलेत महाविकास आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
तथाकथित महाराज संग्राम भंडारे हे राजकीय हेतूने सातत्याने समाजात द्वेष पसरविणारे, भडकविणारे विधाने करत आहेत. अलीकडेच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे धक्कादायक विधान केले असून, त्यातून त्यांनी थोरात यांना जिवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. याशिवाय भंडारे हे वारंवार थोरात कुटुंब व त्यांच्या समर्थकांविरुद्ध चिथावणीखोर विधानं करत असून, सार्वजनिक जीवनात दहशत आणि वैमनस्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्या धमक्या व द्वेषपूर्ण व्यक्तव्याचा अकोलेतील महाविकास आघाडीने जाहीर निषेध करत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देत केली आहे.

या निवेदनातील असे म्हटले आहे की, संग्राम भंडारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी,त्यांच्या सर्व भडखाऊ आणि द्वेषपूर्ण भाषणांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी, अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण कृत्यांना समर्थन करणार्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील जनता सजग आहे आणि कुणीही यापुढे धार्मिक किंवा राजकीय कारणाने गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.आम्ही या विषारी वक्तव्यांचा जाहीर निषेध नोंदवत आहोत आणि प्रशासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा करत आहोत असेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी नेहे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, भा क पा तालुका सेक्रेटरी कॉ. भास्करराव खांडगे, दादापाटील वाकचौरे, सुरेश खांडगे, प्रा. बाळासाहेब शेटे, अरुण वाकचौरे,कॉॅग्रेेस तालुका जनरल सेक्रेटरी संपत कानवडे, भास्कर दराडे, उल्हास कातोरे, संभाजी वाकचौरे, मंदा नवले, भास्कर मंडलीक,पोपट नाईकवाडी, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल नाईकवाडी, शहराध्यक्ष रामदास धुमाळ, विकास बंगाळ, बाळासाहेब भांगरे,रामनाथ शिंदे, भाऊसाहेब थोरात, रजनीकांत भांगरे, मनोज गायकवाड, माणिक अस्वले,बजरंग तोरमल ,निवृत्ती झोळेकर, शब्बीर शेख, सुजित नवले, आण्णासाहेब शेटे, सुदाम वाकचौरे, नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी, गोरक्ष ढगे, अभिजित ढगे आदींच्या सह्या आहेत.

