उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हांला मातोश्रीवर बोलवावे! नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांचे साईदर्शनांतर वक्तव्य


नायक वृत्तसेवा, शिर्डी
आमची तर इच्छा आहे आम्हांला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला मातोश्रीवर बोलवावे, असे वक्तव्य शिंदे गटाचे नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केले आहे. शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

सत्ता स्थापनेनंतर मतदारसंघात येताच नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी (ता.6) सायंकाळी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. गुवाहाटी, गुजरात गोव्याला होतो त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना साईबाबांना केली होती. बाबांनी माझ्या झोळीत ती भेट टाकली आणि मला न्याय दिला. त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आल्याचे कांदे म्हणाले. हे राज्य शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपासून मुक्त व्हावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याचा विकास व्हावा असे साकडं साईबाबांना घातले. मला मंत्रीपदाची जबाबदारी देवो, न देवो, पण ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन, असे कांदे यांनी स्पष्ट केले.


मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ मात्र एकटे जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना बोलावलं तर सर्वांसोबत मातोश्रीवर जावू. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला मातोश्रीवर बोलवावे अशी इच्छा सुहास कांदे यांनी बोलून दाखवली. आमची खदखद ही संजय राऊतांवर नव्हती तर विकास कामांवरच होती. मात्र ज्या चाळीस आमदारांच्या मतांवर संजय राऊत खासदार झाले त्यांनाच राऊतांनी रेडा, डुक्कर असे म्हटले. संजय राऊत मोठे आणि ज्येष्ठ आहेत. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

कांदेंना आला विखे पाटलांचा फोन..
शिर्डीत साई दर्शनानंतर आमदार सुहास कांदे प्रसारमाध्यमांना बाईट देत असतानाच भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा त्यांना फोन आला. तुम्ही शिर्डीत आला. मात्र मला फोन केला नाही असे विखे पाटलांनी विचारले असता, साहेब तुम्ही मिनिस्टर झाल्यावर करू म्हंटल फोन असे कांदे यांनी म्हटल्याने विखे पाटलांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे संकेत कांदे यांनी दिले आहेत.

Visits: 17 Today: 1 Total: 115328

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *