आदिवासींचा इतिहास समाजापुढे मांडावा : आ. डॉ.लहामटे

नायक वृत्तसेवा, राजुर
येथील डोंगर, हिरवा निसर्ग, प्राणी हे आदिवासींचे खरे देव असुन निसर्गाकडून मिळालेले दान व नैसर्गिक शिकवण या परंपरांचे आपण पालन करावे तसेच देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आदिवासी क्रांतीवीरांचे योगदाना विषयी भावी पिढीसमोर इतिहासाची मांडणी व्हावी, व आदिवासी विचारवंतांनी हा इतिहास प्रभावीपणे व अभ्यासपूर्ण आदिवासी समाजासमोर मांडावा असे आवाहन आ.डाॅ. किरण लहामटे यांनी केले.

धरती आबा यांची १५० वी जयंती येत्या १५ नोव्हेंबर रोजी पार पडणार असुन या जयंतीच्यानिमित्ताने १ ते १५ सप्टेंबर अखेर विविध कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत क्रांतीवीरांच्या जीवनावरील व्याख्यान व कार्यशाळेचे राजुर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे अकोले तालुक्याचे आ.डाॅ.किरण लहामटे यांच्या उपस्थितीत व निवृत्त पोलीस अधिकारी पांडुरंग भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.प्रसंगी प्राचार्य संतोष कचरे,डाॅ.भाऊराव ऊघडे, काळु भांगरे,शंकर महाराज घारे,सखाराम डोके,आदिवासी सेवक सखाराम गांगड,रघुनाथ गावंडे, मारुती आगवीले, बाळासाहेब मधे,गंगाराम धिंदळे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य संतोष कचरे व पांडुरंग भांगरे यांनी आदिवासी क्रांतीवीरांच्या जीवनावर ऊपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले व सुत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक नवनाथ गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर, तुषार पवार, योगेश ढोणे आंबादास बागुल ऊपस्थित होते.

Visits: 114 Today: 1 Total: 1107731
