स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : सय्यद

नायक वृत्तसेवा, अकोले
‘बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प, योजना तसेच विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. सन २०२५- २६ करिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठीची जाहिरात बार्टी संकेतस्थळावर तसेच विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत व आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी समतादूत प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी केले.

येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाच्या नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित जनजागृती कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी समतादूत संतोष शिंदे,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त माजी आ.वैभव पिचड, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, कार्यकारिणी सदस्य सुधाकर आरोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके उपस्थित होते.
कार्यशाळेचे नियोजन व यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. अशोक दातीर, प्रा. डॉ. शिवाजी खेमनर, डॉ. विजय भगत, डॉ. किरण जाधव, डॉ. धनराज हाडूळे, प्रा. अरुण वाकचौरे, प्रा. सुरेश मुठे, प्रा. प्रेम माळी, प्रा. दीपक देशमुख, प्रा. किरण कानवडे, प्रा. रोहित झोळेकर, संकेत चौधरी आदींनी परिश्रम घेतले.स्वागत व प्रास्ताविक प्रा. संदेश कासार यांनी केले. आभार डॉ. पंकज नाईकवाडी यांनी मानले.
Visits: 120 Today: 2 Total: 1104232
