संगमनेरकरांना आज मिळाला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा..! मात्र, अठ्ठावीस रुग्ण संख्येसह तालुक्याने ओलांडले बाधितांचे 42 वे शतक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरी रुग्णसंख्येत घट तर ग्रामीण रुग्णसंख्येत सातत्य या शृंखलेमुळे काहीशा संथगतीने तालुक्याने आता 42 व्या शतकाची मर्यादाही ओलांडली आहे. आज खाजगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील केवळ एकासह एकूण 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 4 हजार 212 वर पोहोचली आहे. शहरातून दररोज समाधानाचे धक्के बसत असताना, ग्रामीण भागातील रुग्ण गतीत मात्र अद्यापही सातत्य असल्याने तालुक्याची रुग्णवाढ आजही कायम आहे. आज शहरातून केवळ एक रुग्ण समोर आला आहे. तो ही अशा भागातून, ज्या भागात गेल्या मोठ्या कालावधीत एकही रुग्ण आढळलेला नाही. आजच्या एकूण रुग्णसंख्येत एकट्या आश्वी बुद्रुक मधून सात रुग्ण समोर आले असून त्यातील सहा महिला आहेत.

आज शहरातील अकोले नाका परिसरातून 30 वर्षीय महिलेच्या रुपाने एकमेव रुग्ण आढळून आला आहे. संगमनेरकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. आजच्या अहवालातून आश्वी बुद्रुक मध्ये कोविडचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. तेथील 31 वर्षीय तरुणासह 60, 33, 28 व 20 वर्षीय महिलांसह 14 व 9 वर्षीय बालिका, आश्वी खुर्द मधील 42 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला, खांडगाव येथील 70 वर्षीय नागरिकासह 60 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील 55 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण,

पिंपळगाव कोंझिरा येथील 48 वर्षीय इसम, कोकणगाव येथील 33 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 68 वर्षीय महिलेसह 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि 28 व 25 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 34 व 17 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे येथील 72 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव माथा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वेल्हाळे येथील 40 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अवघ्या एकासह 28 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे 42 वे शतक पूर्ण करीत 4 हजार 212 रुग्णसंख्या गाठली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९५.८५ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत २६५ बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४६२ झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून ६०, खाजगी प्रयोगशाळेतून ५३ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून १५२ जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले.
शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या 60 अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३२, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ११, राहाता ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५, लष्करी परिसरातील ०२ व व लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या 53 जणांच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २०,अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, पारनेर ०१, राहाता ०३, राहुरी ०५, संगमनेर ०७, श्रीगोंदा ०२ व श्रीरामपूर येथील एकाता समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज १५२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ०५, अकोले ०७, जामखेड १७, कर्जत १२, नगर ग्रामीण १९, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी २१, राहाता १५, राहुरी ०५, संगमनेर २१, शेवगाव ११ व श्रीगोंदा येथील सात जणांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या २८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ४१, अकोले १०, जामखेड १७, कर्जत १९, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १६, नेवासा ११, पारनेर २०, पाथर्डी १९, राहाता २३, राहुरी १८, संगमनेर २७, शेवगाव २७, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १६, लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे.

- जिल्ह्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या : ५३ हजार ५७९..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : १ हजार ४६२..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ८५९..
- जिल्ह्यातील आजवरची एकूण रुग्ण संख्या : ५५ हजार ९००..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९५.८५ टक्के..
- आज जिल्ह्यातील २८८ रुग्णांना डिस्चार्ज तर २६५ बाधितांची नव्याने पडली भर..

