देशभक्तीपर घोषणांनी संगमनेर दणाणले! तिरंगा पदयात्रेला शहरवासीयांचा उदंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
मनामनात तिरंगा… श्वासाश्वासात तिरंगा… रोमरोमात तिरंगा…या देशभक्तीपर घोषणा देत संगमनेर शहरात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी ‘ऑपरेशन सिंधूर’च्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.
बुधवारी आयोजित या पदयात्रेला  सकाळी ९ वाजता लाल बहादूर शास्त्री चौकातून सुरुवात झाली. त्यानंतर ही पदयात्रा शहरातील लाल बहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेनरोड,अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, संगमनेर बस स्थानक परिसरातील दत्त  मंदिरासमोर आल्यावर या पदयात्रेचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. या पदयात्रेत निलम खताळ,  भाजपाच्या शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे, डॉ. अशोक इथापे, कैलास कासार, विनोद सूर्यवंशी यांसह संगमनेर शहरातील हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या तिरंगा पदयात्रेत शहरातील नागरिक, तरुणाई, महिला, तसेच विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीत, भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा देत व तिरंगा फडकावत या पदयात्रेने शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले.
Visits: 158 Today: 1 Total: 2125178

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *