पुराणे यांच्याकडून करजगाव शाळेस प्रवेश कमान भेट
पुराणे यांच्याकडून करजगाव शाळेस प्रवेश कमान भेट
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील करजगाव येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास माजी मुख्याध्यापक पी. एम. पुराणे यांनी आपली आई रखमाबाई मुरलीधर पुराणे यांच्या स्मरणार्थ प्रवेश कमान उभारुन दिली आहे.

आदर्श माता पुरस्काराने सन्मानित स्वर्गीय रखमाबाई पुराणे यांनी त्यांच्या हयातीत लोकांच्या शेतात काम करुन आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केलेले होते. आईचे संस्कार, रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर अण्णा यांच्याबद्दल असणारी आत्मियता व कृतज्ञता या सर्व बाबींची जाणीव ठेवून पुराणे यांनी शैक्षणिक कार्यास हातभार लावला आहे. दरमहा निवृत्त वेतनमधून काही रक्कमेची बचत करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची सढळ हाताने मदत करण्याचा प्रयत्न असतो. त्याद्वारेच ही कमान उभारण्यात आली आहे. सदर दातृत्वाबद्दल करजगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शाळा समिती सदस्य, विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक आदिंनी आभार मानले आहे.

