श्री खांडेश्वर देवस्थान विकासासाठी अकरा लाखाचा निधी देणार : खा. वाकचौरे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्री खांडेश्वर देवस्थानच्या विकासासाठी खासदार निधीतून अकरा लाख रुपये देण्याची घोषणा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली. त्याचबरोबर सीएसआर फंडातून देखील चाळीस लाख रुपये उपलब्ध करून देण्यास मी मदत करतो. या निधीच्या माध्यमातून श्री खांडेश्वर देवस्थानला भव्य प्रशासकीय कार्यालय करता येईल असेही खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी यावेळी सांगितले.

सुपुत्र रोहित वाकचौरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी तालुक्यातील खांडगाव येथील श्री खांडेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सरस्वती वाकचौरे, सुनबाई पूजा वाकचौरे, मेजर महेंद्र सोनवणे, श्री खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानुभाऊ गुंजाळ,संगमनेर दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ, खांडगावचे सरपंच विकास गुंजाळ, देवस्थानचे विश्वस्त ॲड. मधुकर गुंजाळ, उबाठा शिवसेनेचे अशोक सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

खा.वाकचौरे यावेळी म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये साईबाबांसारखे आंतरराष्ट्रीय देवस्थान असून माझ्या मतदारसंघात मोठी संत परंपरा राहिलेली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी आहे. माझ्या हातून साधुसंत आणि देव देवतांची सेवा या निमित्ताने होत असते. खांडेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान असून हा परिसर निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी भाविकांचा ओढा कायम असतो. त्यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी माझा नेहमीच पुढाकार राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने रोहित वाकचौरे यांचा वाढदिवस देखील साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक करतांना दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ यांनी प्रशासकीय कार्यालयासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी खा. वाकचौरे यांच्याकडे केली होती. तद्नंतर बोलतांना खा. वाकचौरे यांनी आपल्या भाषणात निधी देण्याचे कबूल केले असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रसंगी श्री खांडेश्वर देवस्थानचे स्वामी दयानंद गिरी महाराज,ट्रस्टचे विश्वस्त मधुभाऊ गुंजाळ, रावसाहेब गुंजाळ, अशोक गुंजाळ, ॲड. विठ्ठल गुंजाळ, विठ्ठल गोसावी, दशरथ बालोडे,लक्ष्मण गुंजाळ, विठ्ठल आप्पा गुंजाळ, उपसरपंच सुनील रुपवते, पोलीस पाटील छाया गुंजाळ, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संजय गुंजाळ, रामनाथ गुंजाळ, शिवाजी वर्पे, बाजीराव गुंजाळ, दादासाहेब रूपवते, कपिल गुंजाळ, संदीप गुंजाळ, महेश गुंजाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Visits: 305 Today: 3 Total: 1110641
