आमदार प्राजक्त तनपुरेंना अटकपूर्व जामीन मंजूर राम गणेश गडकरी कारखाना गैरव्यवहार प्रकरण


नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित असणार्‍यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या सर्वांना वैयक्तिक २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या सर्वांना समन्स बजावून न्यायालयात हजर रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते.

राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीने याआधी पवार दाम्पत्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याबरोबरच जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी ईडीने या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये अनावश्यक आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका ठेवून मनीलॉड्रिंग केल्याचा आरोप केला. याची विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली. ईडीच्या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे मत व्यक्त करत माजी आमदार अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापडिया यांच्यासह राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजीत देशमुख यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वांनी न्यायाधीश रोकडे यांच्या न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Visits: 128 Today: 3 Total: 1109902

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *