लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
२०१८ पासून २०२२ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षीय गृहिणी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गृहिणीने लग्न कधी करणार अशी विचारणा केल्यावर तरुणाने आणि एका महिलेने गृहिणीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली.

याबाबत शहरातील एका उपनगरातील ३० वर्षीय गृहिणीने संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऋषिकेश नामदेव सोनवणे आणि विजया नामदेव सोनवणे (दोघेही रा. राहणे मळा,ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गृहिणीने म्हटले आहे की, आरोपी ऋषिकेश सोनवणे याच्यासोबत मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर आरोपी ऋषिकेश याने फिर्यादीस वेळोवेळी मी तुझ्याशी लग्न करेल असे खोटे लग्नाचे आम्हीसे दाखवून ऑक्टोबर २०१८ ते २०२२ पर्यंत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच शनिवार दि.२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास माझ्याशी लग्न कधी करणार? असे विचारण्यास फिर्यादी महिला गेली असता तिला अश्लील शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच विजया सोनवणे हिने फिर्यादीचे केस धरून शिवीगाळ करत खाली पाडून मारहाण केली. याप्रकरणी ३० वर्षीय गृहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऋषिकेश नामदेव सोनवणे आणि विजया नामदेव सोनवणे या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 105 Today: 3 Total: 1116273
