अल्पवयीन मुलीला हिमाचल प्रदेशात पळवून नेणार्‍यास अटक शिर्डी पोलिसांच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक


नायक वृत्तसेवा, शिर्डी
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणास हिमाचल प्रदेशात जाऊन पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. शिर्डी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी जर ठरवले तर गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याला जेरबंद करू शकतात. याचा प्रत्यय शिर्डी पोलिसांनी आणून दिला आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिर्डी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये काम करणारा हरी सोनार नावाच्या 22 वर्षीय तरुणाने हिमाचल प्रदेशात पळवून नेले होते. पोलिसांनी तेथे जाऊन अवघ्या चार दिवसांत या तरुणाला जेरबंद केले. शिर्डी पोलिसांनी हरी सोनार यांच्या विरोधात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून भादंवि कलम 363, 366 नुसारगुन्हा दाखल केला आहे.

10 जानेवारी रोजी घरासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या तरुणाने पळवून नेले, अशी फिर्याद पोलिसांत दाखल होताच शिर्डी पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील सिमला येथील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर थंडी पडली असतानाही तेथून आरोपी हरी सोनार याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी संभाजी पाटील, पोलीस नाईक कैलास राठोड यांनी केली आहे. या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

Visits: 75 Today: 2 Total: 1104203

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *