तृप्ती देसाईंवर कारवाई करा! मातंग कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन


नायक वृत्तसेवा, आश्वी
मातंग समाजाचे भुषण व भाजपाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्याबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तुप्ती देसाई यांनी अपशब्द काढत चुकीचा व्हिडीओ व्हायरल करून समाजामध्ये नितीन दिनकर यांची बदनामी केली असुन त्यांच्यावर सरकारने तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे संतोष भडकवाड यांनी केली असून पोलिसांनी देसाई यांच्यावर कारवाई करावी यासाठी आश्वी पोलिसांना निवेदन दिले आहे.


भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी नुकतीच तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.तृप्ती देसाईंच्या विरोधात आता जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील भारतीय लहुजी सेना अक्रमक झाली असुन संघटनेच्या वतीने आश्वी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, तृप्ती देसाई यांनी नितीन दिनकर यांच्या खाजगी कार्यक्रमातील व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने तोडुन मोडुन त्याचा दुरुपयोग करत प्रसार मध्यामामध्ये प्रकाशित केला होता. त्यामुळे नितीन दिनकर यांची तसेच सामाजाची बदनामी झाली. यामुळे तुप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेने केली. या निवेदनावर गणेश बलसाने, संतोष भडकवाड, विलास कदम, संतोष बलसाने, रविंद्र कांबळे दत्तात्रय लांहुडे, अनिकेत गायकवाड, सुनल बोरूडे, भाऊसाहेब अव्हाड, जालिंदर आऱणे, सुनिल साळवे, चंद्रकांत कांबळे यांच्या सह्या आहेत.

Visits: 179 Today: 1 Total: 2121254

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *