व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला विंग जिल्हाध्यक्षपदी वैशाली कुलकर्णी यांची नियुक्ती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या अहिल्यानगर महिला विंग जिल्हाध्यक्षपदी संगमनेरच्या मुक्त पत्रकार वैशाली कुलकर्णी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॉइस ऑफ मीडिया ही केवळ पत्रकार संघटना नाही तर एक चळवळ आहे. पत्रकारांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी त्याचबरोबर पत्रकारितेच्या अस्तित्वासाठी ही एक जागतिक व्याप्तीची चळवळ आहे. व्हॉइस ऑफ मीडिया भारतातील अव्वल तर जागतिक पातळीवर सर्वाधिक पत्रकार सदस्य असणारी संघटना आहे. अहिल्यानगर महिला विंगच्या नूतन जिल्हाध्यक्षा वैशाली कुलकर्णी यांचे व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, महिला विंग प्रदेशाध्यक्षा रश्मी मारवाडी, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, सचिव अमोल मतकर यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 109 Today: 1 Total: 1108788
