अरविंद सांगळे यांना ‘क्रीडारत्न’ पुरस्कार जाहीर
अरविंद सांगळे यांना ‘क्रीडारत्न’ पुरस्कार जाहीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय ‘क्रीडारत्न’ पुरस्कार ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अरविंद सांगळे यांना नुकताच जाहीर झाला आहे.
![]()
5 सष्टेंबर, 2020 रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान राष्ट्रीय क्रीडा शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व इतर क्षेत्रातील गुणवंत गुणिजन गौरवरत्न पुरस्कार सोहळा ऑनलाईन पार पडणार असून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही क्रीडा व साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींना विशेष क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्री.सांगळे यांनी ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आपल्या पंचवीस वर्षीय सेवा कार्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञानमाताचे नाव राज्यस्तरावर उंचावले ही त्यांच्या कार्याची पावती आहे. यापूर्वी देखील त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहेत. कोरोना संकटकाळात कोरोना योद्धा म्हणूनही त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या क्रीडा व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊनच त्यांना विशेष क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

