विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूटला एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता

नायक वृत्तसेवा,साकुर
तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या संस्थेला एमबीए व एमसीए अभ्यासक्रमासाठी AICTE, नवी दिल्ली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडून अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
या मान्यतेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १०० टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमांकडे वाढत आहे.
विद्यापीठ मान्यतेनुसार संस्थेने विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात अनुभवी व पात्र प्राध्यापक वर्ग, सुसज्ज व आधुनिक इमारत, उत्कृष्ट संगणक प्रयोगशाळा (कॉम्प्युटर लॅब), वाय-फाय इंटरनेट सुविधा, लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान,प्रशस्त व स्वच्छ हॉस्टेल सुविधा, बस सुविधा आदींचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व एमबीए तसेच एमसीए अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त प्रमाणात प्रवेश घ्यावेत असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष  रामदास पोखरकर, डायरेक्टर डॉ. संतोष पवार, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फटांगरे यांनी केले आहे.
Visits: 215 Today: 1 Total: 2128910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *