अकोले रोटरी क्लबकडून आदिवासी महिलांना रक्षाबंधनानिमित्त अनोखी भेट

नायक वृत्तसेवा, अकोले
नवनवीन संकल्पना घेऊन सामाजिक जाणिवेतून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाने रोटरी क्लब अकोले नेहमीच चर्चेत राहिले आहे. रविवारी (ता.22) देखील रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्यावतीने बहिरवाडी (ता.अकोले) येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करून आदिवासी महिलांना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली.

रक्षाबंधन निमित्ताने रोटरीचे खजिनदार गंगाराम करवर यांच्या संकल्पनेतून थंडी व हवेतील गारवा लक्षात घेऊन 50 आदिवासी महिलांना मोफत ब्लँकेट, बेडशीट व सोलापुरी चादरी यांचे वाटप करण्यात आले. तसेच रोटरीचे माजी अध्यक्ष सचिन शेटे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानास प्रोत्साहन म्हणून बहिरवाडी गावातील महिलांना कचर्‍याची सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मोफत 300 डस्टबिन वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे सेक्रेटरी डॉ. सुरिंदर वावळे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, अरुण सावंत आदिंसह सरपंच गोरख पाडेकर, उपसरपंच डॉ. सतीश चासकर, भानुदास वावळे, सुनील चासकर, भाऊसाहेब फरगडे, अर्जुन चासकर, राहुल येवले, हरीभाऊ पाडेकर, शंकर पथवे, खंडू पाडेकर, माणिक चासकर, संजय पथवे, रमेश आरोटे, संतोष चासकर, सीताराम काळे, आत्माराम चासकर, साहेबराव पथवे, शांताबाई वावळे, जया पथवे, सोनाबाई पथवे, गंगुबाई मेंगाळ, यशोदाबाई पथवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सचिन आवारी यांनी केले. सूत्रसंचालन संतोष वावळे यांनी केले तर आभार डॉ.सुरिंदर वावळे यांनी मानले.

Visits: 9 Today: 1 Total: 79418

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *