विविध विकास कामासंदर्भात माजी आ.पिचड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

नायक वृत्तसेवा, अकोले 
तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई तसेच  सिंचन, रस्ते विकास, आरोग्य सुविधा या प्रश्नांसह विविध विकास कामांसदर्भात माजी आ. वैभव पिचड यांनी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा करत निवेदन दिले.
माजी आ. वैभव पिचड यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अकोले तालुक्यातील विविध प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तसेच अकोले शहर व तालुक्यातील विविध विकासकामे,रखडलेली व प्रास्तावित सिंचन, रस्त्याची कामे,आरोग्याच्या सुविधा, आदी विषयासंदर्भात  चर्चा केली. यावेळी
अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस दिलेली मंजुरी ही अनुसूचित जमातींच्या न्याय, हक्क व विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त करत हा निर्णय  घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी अकोले तालुक्यातील अडचणी, सिंचन, रस्ते विकास, आरोग्य सुविधा हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केली जाईल असा विश्वास माजी आ. पिचड यांना यावेळी दिला.
Visits: 2280 Today: 3 Total: 2124203

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *