अल्पसंख्यांक आयोगावर भोसलेंना संधी मिळावी ः असुर्लेकर
अल्पसंख्यांक आयोगावर भोसलेंना संधी मिळावी ः असुर्लेकर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे राज्य समन्वयक अनिल भोसले यांना राज्य अल्पसंख्यांक आयोगावर संधी मिळावी, अशी मागणी परिषदेचे राज्य सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत निवेदनाद्वारे केली आहे.

या बैठकीस महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे उपाध्यक्ष अॅड.सिरील दारा, मुंबई प्रदेशाध्यक्ष डॅरिल डिसोजा, अॅड.जॅकीम फर्नांडिस (असोसिएशन ऑफ कॅथोलिक), सनोज यादव (बिलिव्हर चर्च), डॉ.एमडी बोर्डे (सीएनआय चर्च), सुखानंद साब्दे (माजी पोलीस आयुक्त मुंबई), पा.धर्मेश, दीपक कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगावर भोसले यांना संधी मिळाली तर त्यांच्या अंगभूत संघटन कौशल्याचा अल्पसंख्यांक समाजासह राज्य सरकारलाही निश्चित लाभ होईल असा विश्वास समाजाला आहे. याकरिता, राज्य शासनाने अनिल भोसले यांची अल्पसंख्याक आयोगावर वर्णी लावावी अशी समाजातून मागणी होत आहे. यास्तव समाजाच्यावतीने ख्रिस्ती विकास मंच, इंडियन ख्रिश्चन यूनायटेड ब्रिगेड, मसीह सेना, यूनायटेड महाराष्ट्र, नॅशनल दलित ख्रिश्चन कौन्सिल, राष्ट्रीय इसाई महासंघ यांसह विविध ख्रिस्ती संघटनेच्यावतीने पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

