मुंबई विद्यापीठाने संदर्भ ग्रंथ म्हणून प्रा. डॉ.कदम यांचे स्विकारले पुस्तक

नायक वृत्तसेवा, अकोले 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार मुंबई विद्यापीठाने बी.ए. च्या वर्गांचा अभ्यासक्रम बदलला आहे. तो अभ्यासक्रम व संदर्भ ग्रंथ सूची विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. एस.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात ‘ललितगद्य’ या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या विषयाला अनुसरुन प्रा. डॉ. रंजना कदम यांचे ‘ललितगद्य लेखन’ हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून मुंबई विद्यापीठाने स्विकारले आहे.
      या पुस्तकात ललितगद्य या वांग्मय प्रकाराचे  संकल्पना, स्वरूप, वेगळेपण, वैशिष्ट्ये, ललितगद्याचे घटक, ललित गद्याचा इतिहास आणि कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, इरावती कर्वे,  इंदिरा संत, इरावती कर्वे यांच्या ललितगद्य लेखनाचा आढावा घेतलेला आहे.प्रा.डॉ. रंजना कदम ह्या मराठी विषयाच्या विभाग प्रमुख म्हणून अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविदयालय अकोले येथे कार्यरत आहेत. त्यांचे ‘भाषिक कौशल्य विकास’ आणि नुकतेच प्रकाशित झालेले ‘विचारवेध’ ही पुस्तके प्रकाशित आहेत.त्यांच्या या पुस्तक निवडीबद्दल इंद्रजीत भालेराव, डॉ. कैलास दौंड, तुकाराम धांडे, डॉ. संदीप सांगळे,  डॉ. तुकाराम रोंगटे, प्राचार्य भास्कर शेळके, डॉ. लता देशमुख, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, जितिन साठे, भाऊसाहेब चासकर, भाऊसाहेब कासार, बाळासाहेब बनकर, दीपक पाचपुते, अभ्यासक, लेखक, पत्रकार  व अकोले एज्युकेशन संस्थेतील अधिकारी- पदाधिकारी  यांनी अभिनंदन केले आहे.
Visits: 185 Today: 1 Total: 2128904

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *