गिर्हेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधार फाउंडेशन संगमनेर यांच्यावतीने आधार शाळा दत्तक योजने अंतर्गत निवृत्त मेजर सूर्यकांत घेगडमल यांच्या दातृत्वातुन संगमनेर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी वस्तीतील गिर्हेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ४४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आनंदून गेले होते. आधार फाउंडेशनचे समन्वयक व शिलेदार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधार फाउंडेशन संगमनेर गत अकरा वर्षांपासून दरवर्षी आदिवासी व दुर्गम भागातील एक शाळा निवड करत असते. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढा शैक्षणिक साहित्याचा साठा आधार परिवारातर्फ देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आधारचे शिलेदार निवृत्त मेजर सूर्यकांत घेगडमल यांनी आधारला पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली व या देणगीतून आपली पत्नी कै. शांताबाई यांच्या स्मरणार्थ आधार शाळा दत्तक योजना हा आधारचा उपक्रम दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रातील गिर्हेवाडी या ठिकाणी राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शालेय दप्तर, परिपूर्ण स्टेशनरी, पाणी बाटली इत्यादी साहित्य देण्यात आले.

यावेळी आधारचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, सोमनाथ मदने, बाळासाहेब पिंगळे,पी. डी. सोनवणे, तान्हाजी आंधळे, आधारचे शिलेदार संतोष शेळके, राजू राहाणे, भाऊसाहेब वैद्य, सुभाष घनदाट, कैलास वराडे, लक्ष्मण कोते, संतोष टावरे, सोमनाथ गडाख, डॉ. रामनाथ गोडगे, सत्यवर्धन अरगडे, राजू मुसळे, मारुती पवार, भिमाजी गोंदके, बाळू दूधवडे आदीसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक विजय कांबळे यांनी मानले.

