ग्रामविकास अधिकारी इल्हे यांची बदली रद्द करा : सरपंच गायकवाड

नायक वृत्तसेवा, आश्वी
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष आणि तत्पर ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांची झालेली बदली त्वरित रद्द करून त्यांची पुन्हा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून फेर नियुक्ती करावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा सरपंच अलका गायकवाड यांनी केली आहे.

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांची तालुक्यातील दाढ खुर्द येथे पंधरा दिवसापूर्वी बदली झाली आहे. त्यांची बदली त्वरित रद्द करावी यासाठी आश्वी खुर्द ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच अलका बापुसाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी उपसरपंच बाबा भवर, सदस्य संजय भोसले, सोपान सोनवणे, सागर भडकवाड, प्रवरा बँकेचे संचालक बापुसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, विलास गायकवाड, राजेंद्र सोनवणे, दगडु गायकवाड, शोभना सोनवणे सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऐन वेळच्या विषयावर चर्चा सुरू असतानासंतोष भडकवाड यांनी प्रविण इल्हे यांची बदली त्वरित रद्द करावी असा ठराव मांडला, त्या ठरावाला सर्व महिला व उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा दिला.

ग्राविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गावात अनेक प्रश्न प्रलंबित होते. स्वच्छता, आरोग्य, विकास कामे सगळे प्रश्न प्रलंबित होते, प्रवीण इल्हे यांनी पदभार स्विकारल्यानंतर गावातील स्वच्छतेच्या बाबतीतले सर्व प्रश्न मार्गी लावले. दलित वस्ती, जनसुविधा सर्व कामे योग्य रितीने मार्गी लागले. सर्व सामान्य जनतेची कामे तात्काळ मार्गी लावत, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणत सर्वांशी मनमिळावू पणाने काम करून गावातील नागरिकांच्या मनात स्थान निर्माण केले. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना घरकुल, रोजगार हमी योजनेअंतर्गत गायगोठा तसेच इतर सर्व योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे काम त्यांनी केले. गावातील स्वच्छता विषयक कामे निव्वळ खुर्चीवर बसून आदेश न देता प्रत्यक्ष जाऊन येणाऱ्या अडचणी दूर करून मार्गी लावले, महिला सक्षमीकरण, शाळा, अंगणवाडी डिजिटल करणे, सौर ऊर्जेचा वापर करून सौर हायलॅम्प बसविले, दिव्यांग बांधवाना लाभ मिळून देणे, असे कित्येक कामे त्यांनी त्याच्या कार्यकाळात केलेली असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत त्यांचे कौतुक करत त्यांची झालेली बदली तात्काळ रद्द करावी अशा मागणीचा ग्रामसभेत आग्रह धरला, त्यामुळे सरपंच अलका बापूसाहेब गायकवाड व उपसरपंच बाबा भवर यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

आम्ही दिड वर्षापूर्वी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्हे यांनी पदाधिकारी, ग्रामस्थ व शासन यांच्यातील दुवा होत विकास कामे व दैनंदिन कामकाज अतिशय योग्यपणे मार्गी लावले. त्यांची अचानक झालेल्या बदली मुळे नागरिक व पदाधिकारी यांच्यात तीव्र संताप असल्याने त्यांची बदली तात्काळ रद्द करावी अन्यथा ग्रा.प.कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देत लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सरपंच अलका गायकवाड यांनी सांगितले.

Visits: 117 Today: 1 Total: 1416400
