माया जालात न अडकता समृद्ध जीवन घडवा : पोखरकर

नायक वृत्तसेवा, अकोले
जीवनात सुख आणि आनंद मिळवण्याची साधने बदलली. शॉर्टकट सुखाच्या नादात आपण आपला आत्मविश्वास, स्वाभिमान, शौर्य विसरून सोशल मीडियाच्या मायाजालात अडकून पडलो असल्याने, त्यातून बाहेर पडून समृद्ध जीवन घडविण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विजय पोखरकर यांनी केले.

स्वातंत्र्य सेनानी बा. ह नायकवाडी यांनी स्थापन केलेल्या श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ५९ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता पाचवी, इयत्ता आठवी व दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत जे विद्यार्थी बसले होते, त्यांचाही सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विजय पोखरकर बोलत होते. यावेळी ऑस्ट्रेलिया स्थित शाळेचे माजी विद्यार्थी बीपीन चासकर प्रमुख पाहुणे, कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, पत्रकार अमोल वैद्य, माजी मुख्याध्यापक आर.टी. सोनवणे, दिलीप शेणकर, प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपमुख्याध्यापक प्रकाश सोनवणे, मंगेश खांबेकर, संजय शिंदे, श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयांमधील आजी-माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन संजय पवार यांनी तर आभार प्रकाश सोनवणे यांनी मानले.

विद्यार्थी हा प्रचंड अनुकरणीय असतो म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त केली, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही यापुढे उत्तुंग यश संपादन कराल असा विश्वास बीपीन चासकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Visits: 120 Today: 1 Total: 1103329
