रहिमपूर शाळेत योग दिवस साजरा चिमुकल्यांनी घेतले योगाचे धडे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल शनिवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत त्यांच्याकडून वेगवेगळी असने करून घेतली.
शनिवारी जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन तालुक्यातील रहिमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना योगाचे धडे देत त्यांच्याकडून योगाची वेगवेगळी असने करून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनीही शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे योगाचे धडे गिरवत योग असने केली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, मुख्याध्यापक उत्तम जगधने, शिक्षिका वैशाली काळे, अलका पाटोळे, अंगणवाडी सेविका रंजना फाटे, सहाय्यक तारा किनकर सहित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग असने केल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलून गेले होते.

Visits: 153 Today: 1 Total: 2113566

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *