समाज घडवण्याच्या दायित्वातून वारकरी शिक्षण संस्थेची पायाभरणी : कडलग महाराज

नायक वृत्तसेवा, आश्वी
मृत्यु लोकात आल्यावर पुण्य मिळवण्यासाठी कोणी ही प्रय़त्न करत नाही.जर अनाथ विद्यार्थ्यांची सेवा आपल्या हातुन झाली तर आपल्याला ही त्या पुण्याची प्रचिती मिळेल. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आध्यात्माचे शिक्षण देतानाच समाज घडविण्याच्या दाय़ित्वातुन माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेची पाया भरणी केल्याचे प्रतिपादन अनिल महाराज कडलग यांनी केले.

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मरणार्थ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी व आकाऊंट विभागाच्या कामगारांच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील आनाथ मुलांच्या आश्रमासाठी गृहउपयोगी वस्तीचे वाटप करण्यात आले.यावेळी कारखान्याचे संचालक विजय म्हसे,भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रविंद्र थोरात,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव ॲड. श्रीराज डेरे,दिपक भगत,अशोक कानडे,किरण गुंजाळ, जनरल मँनेजर संजय मोरे,सुरेश चव्हाण,किशोर आहेर,विठ्ठल बेंद्रे यासह सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कडलग महाराज पुढे म्हणाले की, लोक सहभागातुन माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थाची पायाभरणी झाली असुन या कामी घरातील मंडळीचा मोठा हातभार असल्याने संस्था नावारूपाला येत आहे. समाजातील लहान मोठ्या दानशुर लोकांनी संस्थेला तसेच आश्रमाच्या राहिलेल्या बांधकामासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ तेलोरे, दिलीप प्रधान, गंगा राऊत, संजय गायकवाड, सतिष शिंदे, संग्राम पावले, आबा गावडे, अरूण साळवे आदीनी मोलांचे सहकार्य़ केले.

पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांना आध्यात्मिक कामाची फार आवड होती.याच हेतुने त्यांच्या स्मरणार्थ पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी व आकाऊंट विभाग कामगारांच्या वतीने माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना आवश्यक असलेल्या गृह उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले असल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय मोरे यांनी सांगितले.

कारखान्याच्या शेतकी व आकाऊंट विभागाच्या सुप्त उपक्रमाने मी भारावुन गेलो असुन खऱ्यां अर्थाने कारखान्याचा संचालक असल्याचा अभिमान वाटतो, कामगार बंधुनी अनाथ आश्रमाला दिलेल्या गृहवस्तुने आश्रमास मोठी मदत मिळाली असुन भविष्यात संचालक मंडळाकडुन ही आश्रमास आवश्यक वस्तुचा पुरवठा केला जाईल असे कारखान्याचे संचालक विजय म्हसे यावेळी म्हणाले.

Visits: 128 Today: 2 Total: 1098778
