जलसंपदाच्या जुन्या इमारतीचे रूपडे पालटणार जागेची केली पाहणी; मंत्री विखे पाटील यांचा पुढाकार

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
शहरानजीकच्या घुलेवाडी येथे असलेल्या जलसंपदा विभागाच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे लवकरच रुपडे पालटणार असून त्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी केली.
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या  कार्यालयाला आता नाविन्यता प्राप्त होणार आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून येथे सिंचन भवन, शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने करून त्याची कार्यवाही सुरू केली आहे.
घुलेवाडी येथे जलसपंदा विभागाचे कार्यालय अनेक वर्षे कार्यरत आहे.जुन्या इमारतीत असलेल्या व परीपूर्ण सुविधा नसलेल्या, अनेक प्रकल्पाचे विभाग एकाच ठिकाणी आणि अधिकारी, कर्मचारी यांच्या वसाहतीचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
वसाहतीच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून,आराखड्याची आणि जागेची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहाणी करून याबाबतच्या मार्गदर्शक सुचना केल्या. यावेळी आ.अमोल खताळ,  भाजपाचे ॲड. श्रीराम गणपुले, पायल ताजणे, श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले,  राष्ट्रवादीचे कपिल पवार, शिवसेनेचे विठ्ठल घोरपडे, रामभाऊ राहाणे, डाॅ. अशोक इथापे, आबासाहेब थोरात  यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याचबरोबर संगमनेर वकील संघाने या परीसरात जागेची मागणी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.कालच्या भेटीत वकील संघाच्या सदस्यांनी मंत्र्यांना  विकसित प्रकल्पाची माहीती दिली.न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा दिली. भविष्यात तुम्हालाही सहकार्य करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिली. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आ.अमोल खताळ यांच्या शहरातील नविन कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
या परीसरातील कार्यालयाचे नूतीकरण करतानाच एक भव्य अत्याधुनिक शेतकरी ट्रेनिंग सेंटर  विकसित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने केला आहे.प्रामुख्याने बंदीस्त पाइपलाईनद्वारे पाणी देण्याच्या व्यवस्थेचे मुख्य केंद्र उभारण्याचे नियोजन विभागाचे आहे.
Visits: 384 Today: 3 Total: 1594189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *