नॉट रिचेबल कुंभारवाडी-जोंधळवाडी लवकरच संपर्क क्षेत्रात!

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर  तालुक्याच्या पठार भागातील विशेषतः डोंगरीभागातील नॉट रिचेबल कुंभारवाडी(वरवंडी) तसेच जोंधळवाडी(दरेवाडी) परिसर लवकरच संपर्क क्षेत्रात येणार आहे. त्या संबंधी दूरसंचार मंत्रालयाने नवीन प्रोजेक्ट द्वारे अडचणी सोडवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी दिली.
पठार भागातील कुंभारवाडी आणि जोंधळवाडी परिसरातील नागरिकांना नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने स्थानिक नागरिक तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक,प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे  यांच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय दूरसंचार मंत्री, राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आजी,माजी लोकप्रतिनिधी यांना निवेदनामार्फत कळविण्यात आले होते, त्यावर उपाययोजना म्हणून टेलिकॉम कंपन्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले, परंतु संबंधितांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता दूरसंचार मंत्रालयाला चुकीचा अहवाल सादर केल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाबरोबरच केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यांनतर केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने टेलिकॉम कंपन्यांना संबंधित गावांचा नेटवर्क समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी कुंभारवाडीला नवीन प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिनांक २९ मे २०२५ रोजी दिले असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने कळविले आहे, परंतु दरेवाडी मध्ये जरी जिओ टॉवर असला तरी देखील दरेवाडीचाच भाग असलेल्या जोंधळवाडी परिसराला त्याचे नेटवर्क पोहचत नसल्याचे निदर्शनास आणून देत जोंधळवाडी परिसराचा देखील नवीन प्रोजेक्ट मध्ये समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी केल्यानंतर संबंधित विभागाने यास अनुकूलता दाखवली असून लवकरच कुंभारवाडी, जोंधळवाडी संपुर्ण परिसर केंद्र शासनाच्या नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून संपर्क क्षेत्रात (नेटवर्क)  येणार असल्याचे शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक,प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे  यांनी सांगितले.
Visits: 47 Today: 2 Total: 1102798

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *